१९व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण ३०३खेळाडू झुंजणार

१९व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत एकूण ३०३खेळाडू झुंजणार 

स्पर्धेत लक्ष्मण आरआर, मोहम्मद शेख, अभिषेक केळकर, पद्मिनी राऊत, विक्रमादित्य कुलकर्णी हे मानांकित खेळाडू सहभागी 

पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित १९व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून ३०३खेळाडूंमध्ये १७५ मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा गणेश सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे १० व ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रंगणार आहे. 

बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले कि, हि स्पर्धा एआयसीएफ यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण २लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग फॉरमॅट प्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण ९फेऱ्या होणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, गोवा, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, पंजाब या राज्यातून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. 

स्पर्धेत ग्रँडमास्टर लक्ष्मण आरआर(२२१७), आयएम मोहम्मद शेख(२३०२), आयएम सम्मेद शेटे(२२८०), आयएम पद्मिनी राऊत(२२७४), आयएम राहुल व्हीएस(२२५२), आयएम कुशाग्र मोहन(२२२८), आयएम विक्रमादित्य कुलकर्णी, आयएम अभिषेक केळकर(२१६३)हे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेसाठी आयए राजेंद्र शिदोरे हे चीफ आरबीटर, तर आयए विनिता श्रोत्री हे डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Lambkhane, Gawate, Singh , Bhalinge, Kamath ,Wagh, Gaonkar, Kamble , Sharma Win at Pune City Marathon

Dyson Opens Maharashtra’s Largest Demo Store in Pune

कृषि पणन मंडळाचा ‘संत्रा महोत्सव’ पुण्यात होणार सुरू