कृषि पणन मंडळाचा ‘संत्रा महोत्सव’ पुण्यात होणार सुरू
पुणे : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पने अंतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश आहे. सन २००३ पासून सुरू असलेल्या पणन मंडळाच्या आंबा महोत्सवास तसेच मागील वर्षी पासून सुरू करण्यात आलेल्या मिलेट महोत्सवास पुणेकरांचा चांगला प्रतिसाद लाभला. या मिलेट महोत्सवामध्ये प्रायोगित तत्वावर काही संत्रा उत्पादकही सहभागी झाले होते व त्यांच्याकडील संत्रा खरेदीलाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सदर महोत्सवांची व्याप्ती वाढवावी व शेतमाल उत्पादकांना जास्तीत जास्त विक्रीचे विविध पर्याय उपलब्ध करून देणेबाबत राज्याचे पणन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ मा.ना.श्री.जयकुमार रावल यांनी सूचित केलेले होते. यास अनुसरूनच चालू वर्षी कृषि पणन मंडळामार्फत ‘संत्रा महोत्सव -२०२५’चे आयोजन गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे करण्यात येणार आहे. संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया हि...